संघर्ष नसेल, तर मी मुंडेंची मुलगी कसली ?
By admin | Published: August 25, 2015 02:25 AM2015-08-25T02:25:13+5:302015-08-25T02:25:13+5:30
गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मीसुद्धा सत्तेत असली तरी मलाही संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष नसेल तर मी मुंडेची मुलगी कसली, असा सवाल ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण
नाशिक : गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मीसुद्धा सत्तेत असली तरी मलाही संघर्ष करावा लागत आहे. संघर्ष नसेल तर मी मुंडेची मुलगी कसली, असा सवाल ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे बोलताना केला.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली. सहविचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या, की मुंडे साहेबांची जागा घेण्याइतपत मी मोठी नाही. त्यांची जागा मी कधीही घेऊ शकणार नाही. मात्र त्यांनी ज्या रस्त्यावर चालण्यासाठी मला उभे केले, त्या मार्गावर चालण्यासाठी मी जीवन वाहून घेतले आहे. माझ्यावरही आता अनेक संकटे आली. मी थोडेसे घाबरले होते. मात्र जीवनात संघर्ष नसला तर मी मुंडेंची मुलगी कसली, असे त्यांनी सांगितले. मुंडे साहेबांचा जातपात, वंशवाद, घराणेशाही यावर विश्वास नव्हता. मात्र मला माझ्या समाजाचा अभिमान बाळगण्यात गैर वाटत नाही.
मी या संस्थेचे पालकतत्व स्वीकारले असून, माझ्या लोकांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
धनंजय मुंडेंवर पलटवार
चिक्की वाटप प्रकरणी आरोप करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पलटवार केला. प्रभू रामचंद्रांना बिभीषणने मदत केली तरी त्यांना कोणीही चांगले म्हटलेले नाही.