लाट आहे तर मोदींच्या 22 सभा कशाला ?

By Admin | Published: October 2, 2014 02:48 AM2014-10-02T02:48:35+5:302014-10-02T02:48:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर लाट आहे तर त्यांच्या 22 जाहीर सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

If there is a wave, why should 22 meetings of Modi? | लाट आहे तर मोदींच्या 22 सभा कशाला ?

लाट आहे तर मोदींच्या 22 सभा कशाला ?

googlenewsNext
उद्धव यांचा सवाल : हा महाराष्ट्र आहे, ध्रुतराष्ट्र नाही
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर लाट आहे तर त्यांच्या 22 जाहीर सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. हा महाराष्ट्र आहे ध्रुतराष्ट्र नाही, असा चिमटाही त्यांनी भाजपाला काढला.
काही शीख संघटना व रिपब्लिकन गटांनी सेनेला पाठिंबा जाहीर केला. या वेळी युती का तुटली ते मला माहीत नाही, असे मत व्यक्त करून उद्धव म्हणाले, की लोकसभा निवडणूक सेना-भाजपा महायुती म्हणून लढली होती. महाराष्ट्रात कधीही 48 पैकी 42 जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याबाबत नीट विचार केला पाहिजे, असे आपले मत आहे. त्यामुळे लागेच अनंत गीते यांच्या राजीनाम्यापासून घूमजाव केले, असा होत नसल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले. 
 
यंदा दसरा मेळावा नाही 
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा होणार नाही. परंतु प्रथेनुसार शस्त्रपूजन, रावणाचे दहन हे कार्यक्रम होतील. भाषणो होणार नाहीत. पुढील वर्षापासून पुन्हा दसरा मेळावा अन्यत्र आयोजित केला जाईल, असे उद्धव म्हणाले.
 

 

Web Title: If there is a wave, why should 22 meetings of Modi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.