डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

By admin | Published: September 7, 2014 12:20 AM2014-09-07T00:20:23+5:302014-09-07T00:20:23+5:30

रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़

If they have lost their heads, they are confused | डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

डोक्यात हवा गेली असेल तर तो त्यांचा भ्रम

Next
पुणो : रिपब्लिकन पक्षाची 5-6 जागांवर बोळवण करायची असे त्यांनी ठरविले असेल, तर तो आमच्यावर अन्याय आह़े आम्हालाही विचार करावा लागेल़ महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े पण, लोकसभा निवडणुकीतील विजयाने त्यांच्या डोक्यात हवा असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल, असा इशारा  रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला दिला. 
गणोशोत्सवातील गणोश मंडळांच्या आरतीसाठी आठवले आज पुण्यात आले होत़े याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.  ते म्हणाले, ‘‘लोकांचा विरोध असताना आम्ही युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला़ खडकवासला विधानसभेतील निकालानंतर  अनेकांनी आमचा निर्णय बरोबर असल्याचे सांगितल़े शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभ्यास करून दलित मते आपल्याकडे यावीत, यासाठी शिवशक्ती -भीमशक्तीची साद घातली़ बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे यांना साकारायचे आह़े त्यांनी आपल्याकडील 5-1क् जागा वाढवून द्याव्यात़ मोठय़ा भावाने छोटय़ाला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावा़ आरपीआयला ताकद देण्याचा 
विचार करावा़ 
मागील निवडणुकीत आम्ही तिस:या आघाडीबरोबर होतो़ पण, दलित जनतेला ही आघाडी युती आणि काँग्रेस आघाडीला पर्याय ठरू शकेल, असे वाटले नाही़ त्यामुळे या आघाडीत आमचा पक्ष मोठा असला तरी मते मिळवू शकला नाही़ आम्ही काँग्रेसबरोबर असताना शरद पवार यांनी 199क् मध्ये आम्हाला 12 जागा दिल्या होत्या़ युतीने आणखी एक पाऊल पुढे टाकाव़े 15 ते 16 जागा आणि सत्तेत 15 टक्के सहभाग द्यावा,  अशी आमची अपेक्षा असल्याचे आठवले यांनी सांगितल़े
तुम्ही मागितलेल्या जागांवर शिवसेना, भाजप आघाडीतील 
नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, एवढय़ा सगळ्यांना घेण्याची आवश्यकता नसल्याचे आठवले म्हणाले.                        (प्रतिनिधी)
 
च्युती आणि आघाडीतील दोन्ही पक्ष व त्यांचे नेते आपापल्या ताकदीवर निवडून येतात़ ही त्यांची सर्वात मोठी ताकद आह़े आरपीआय कार्यकत्र्यानीही जनतेत जाऊन 5 वर्षे काम केले पाहिज़े दुस:याच्या भरवशावर किती दिवस राहणार? असा सवालही रामदास आठवले यांनी कार्यकत्र्याना केला़
च्विधानसभेचा निकाल हा 5 ते 1क् हजार मतांवर ठरतो़ प्रत्येक मतदारसंघात आरपीआयची तेवढी ताकद आह़े महायुती टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आह़े एकटय़ाने नाही तर दोघांनीही दलित मते वळविण्यासाठी त्याचा विचार केला पाहिज़े 
च्पुण्यातील पुणो कॅन्टोन्मेंट, पिंपरी, दौंड, खेड आळंदी या जागांची मागणी केली आह़े दौंडची जागा मिळाली तर तेथून राहुल कुल तसेच खेड आळंदीतून पोपटशेठ घनवट आमच्याकडून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितल़े
 

 

Web Title: If they have lost their heads, they are confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.