उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 03:20 PM2019-07-12T15:20:39+5:302019-07-12T15:23:06+5:30

सोलापूर : आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल ...

If Uddhav Thackeray becomes chief, we will be happy: | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

Next
ठळक मुद्देआषाढी एकादशी निमित्त नीलम गोरे या सोलापूरच्या दौºयावर राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार - नीलम गोºहेआजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली - नीलम गोºहे

सोलापूर: आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

आषाढी एकादशी निमित्त नीलम गोºहे या सोलापूरच्या दौºयावर आल्या होत्या. पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन च्या शुक्रवारी दुपारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल यावर उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन निर्णय होईल. युवकांना राजकारणात प्रेरणा मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे विधानसभेत आले तर एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. असही नीलम गोºहे यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नीचा पुनर्वसन करण्यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. मिळालेल्या पदांपेक्षा 'मातोश्री च नातं' हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे. असंही ही त्या यावेळी म्हणाल्या.

पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, नगरसेवक गणेश वानकर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.
------------
एनजी मिलचा अभ्यास करू...
नरसिंग गिरजी मिलच्या विषयावर बोलताना नीलम गोºहे म्हणाले की, नियमानुसार एखादी मिल बंद पडली तर त्याची जागा ही मिलची जागा कामगारांना दिली जाते. नरसिंगमिलबद्दल मला कल्पना नाही, पण ही मिल कोणत्या कारणासाठी पाडली जाणार आहे याची याबाबत माहिती घेतली जाईल़ पुरातत्व खात्याकडून याची माहिती घेतली जाईल असेही यावेळी नीलम गोºहे यांनी सांगितले़

Web Title: If Uddhav Thackeray becomes chief, we will be happy:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.