Uddhav Thackeray vs BJP: उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:39 PM2022-12-05T15:39:06+5:302022-12-05T15:39:50+5:30

कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही, असेही ते म्हणाले

If Uddhav Thackeray join hands with Owaisi still BJP will win all elections in future says BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray vs BJP: उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला

Uddhav Thackeray vs BJP: उद्धव ठाकरेंनी ओवेसींशी जरी युती केली तरीही...; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा सणसणीत टोला

googlenewsNext

Uddhav Thackeray vs BJP: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरच (Prakash Ambedkar) काय ओवेसी (Owaisi) यांच्याशीसुद्धा युती करू शकतात. पण त्यांनी तसं जरी केलं आणि आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजपा युतीच जिंकेल, असा सणसणीत टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आम्ही एक्कावन्न टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी नवी दिल्लीत गेले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर बावनकुळे यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. "उद्धव ठाकरे यांनी कोणाशीही युती केली तरीही आम्ही निवडणूक जिंकण्यास सज्ज आहोत. महाविकास आघाडीच्या रुपाने आमचे विरोधक यापूर्वीच एकत्र आहेत. तरीही आम्ही राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्या आहेत. कोणतेही पक्ष आमच्या विरोधात एकत्र आले तरी फरक पडत नाही. शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष संघटना मजबूत करत आहेत. आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याची तयारी करत आहोत. त्यामुळे विरोधकांच्या युतीमुळे आम्हाला फरक पडणार नाही," असे बावनकुळे म्हणाले.

"मागासवर्गीयांची किंवा आदिवासींच्या मतांवर कोणाची मालकी नाही. कोण काम करते हे पाहून लोक मतदान करतात. लोक शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार काम करून संविधानाचे रक्षण करत आहेत, हे लोक पाहतात. मोदीजी आपले हित जोपासतात हे ते जाणतात. नंदूरबार जिल्ह्यात ७५,००० आदिवासींनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्यासाठी धन्यवाद मोदीजी अशी पत्रे लिहिली, हे ध्यानात घेतले पाहिजे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाच्या निकालाची सर्वांनी वाट पहावी. न्यायालयाचा अवमान होईल, असे वर्तन कोणी करू नये. कोणीही आक्रमक भूमिका घेऊ नये. संयमाने काम करावे," असे सूचक विधानही त्यांनी केले.

Web Title: If Uddhav Thackeray join hands with Owaisi still BJP will win all elections in future says BJP Maharashtra Chief Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.