'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 03:56 PM2021-08-30T15:56:56+5:302021-08-30T15:59:36+5:30

MNS DahiHandi Mumbai: ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं.

'If we don't allow Dahihandi to be celebrated in Thane, we will do it in Dadar', says MNS leader sandeep deshpande | 'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

Next

दादर:दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. तसेच, मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. ठाण्यातील दहीहंडी उत्सह बंद पाडला असला तरी, दादरमध्ये दहीहंडी होणार अशी भूमिका मनसेचे सरचीटणीस संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.


आज श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं दहीहंडी साजरी करण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. पण, सरकारी आदेश झुगारून ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर आता दादरमध्ये  दहीहंडी उभारण्यात येणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. दरम्यान, देशपांडे यांचे हे ट्विट समोर येताच दादर पोलीसांनी संदीप देशपांडेंच्या शाखेवर दाखल होऊन देशपांडेंसह संतोष धुरी यांना नोटीस दिली आहे.

 
मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
ठाण्यात मनसेचं दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. त्यानंतर मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषणाला सुरुवात केली. कार्यक्रमाला परवानगी नसतानाही स्टेज उभारणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

यादरम्यान, राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग हिंदू सण साजरे करायला बंदी का? असा सवाल उपस्थित करत अविनाश जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेनं दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यास सुरुवात केली होती. याठिकाणी पोलिसांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांना घटनास्थळी जावून समजवण्याचा प्रयत्न केला. पण मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे
 

Web Title: 'If we don't allow Dahihandi to be celebrated in Thane, we will do it in Dadar', says MNS leader sandeep deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.