मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:15 PM2023-11-02T15:15:01+5:302023-11-02T15:15:37+5:30

मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला. 

If we don't get Maratha reservation, we will retire, Fadnavis said...; Eknath Khadse reminded | मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

मराठा आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईन, फडणवीस म्हणालेले...; खडसेंनी करून दिली आठवण

सुरुवातीच्या काळात सुप्रिम कोर्टात जे विधेयक मांडले गेले ते जाणीवपूर्वक मराठा आरक्षण संदर्भात विधेयक कमजोर व्हावे असा प्रयत्न केला गेला. आता तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे आरक्षण जे आहे ते तुम्ही मिळवून दाखवा, उगाच इतरांना कशासाठी दोष देत आहात असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्राने यात हस्तक्षेप करून घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाला न्याय देण्यासंदर्भात गेल्या  काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितलं होते की जर मी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन. अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी मागणी खडसेंनी केली आहे. 

मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे एकटा मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतो, असा सवालही खडसे यांनी केला. 

सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जात असेल. मात्र ज्या ज्या वेळी संकटमोचक गिरीश महाजन हे भेटीला गेले आहेत ते फेल ठरले आहेत. विनाकारण शिष्ट मंडळ बनून जायचे आणि नाटक करायचे. फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिष्ट मंडळ जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेले तरी तो प्रश्न सुटणार नाही. प्रामाणिक इच्छा असेल तर विधानसभेत प्रस्ताव मंजूर करावा. तो दिल्ली येथे घेऊन जाऊन घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावे. अधिवेशन हे घेतलेच पाहिजे आणि त्यात हा प्रश्न सोडवला पाहिजे, असेही खडसेंनी म्हटले आहे. 
 

Web Title: If we don't get Maratha reservation, we will retire, Fadnavis said...; Eknath Khadse reminded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.