उशिर झाला तरी कर्जमाफीच्या रक्कमा बँक खात्यावर जमा होतील - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 12:48 PM2017-10-11T12:48:12+5:302017-10-11T12:49:25+5:30
शेतक-यांनी चिंता करु नये. कर्जमाफीचा मसुदा सर्वच राजकीय पक्षांना दाखवून घेतला होता. त्यामुळे कोणाच्या आंदोलनाची फिकिर नाही.
Next
अहमदनगर - शेतक-यांनी चिंता करु नये. कर्जमाफीचा मसुदा सर्वच राजकीय पक्षांना दाखवून घेतला होता. त्यामुळे कोणाच्या आंदोलनाची फिकिर नाही. उशिर झाला तरी कर्जमाफीच्या रक्कमा बँक खात्यावर जमा होतील असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये पत्रकारपरिषदेत सांगितले.
निवडणुका हेच खरे मूल्यमापन असते. त्यात भाजपला यश मिळाले. अण्णा हजारे यांचा मागण्यांचा मसुदा येवू द्या, नंतर त्यावर विचार करु असे दानवे म्हणाले.
सरकारमध्ये सेनेच्या मंत्र्यांचा चांगला समन्वय आहे. पक्ष म्हणून त्यांची भूमिका वेगळी असू शकते. आंमदोलने केल्याने जनता सोबत राहील असे त्यांना वाटत असावे.