घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:45 AM2021-04-16T00:45:33+5:302021-04-16T07:16:26+5:30

Rajesh Tope : जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

If we leave home, we will be admitted to a private hospital, Health Minister Rajesh Tope warned | घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा

घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा

Next

मुंबई : ज्या रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजेच गृह अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे, ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करावे लागेल व त्याचा खर्चदेखील त्यांनाच करावा लागेल, असा इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा, ऑक्सिजन, तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा, पॉझिटिव्ह रुग्णांच्या गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, आदी उपस्थित होते.यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही, याकडे लक्ष द्या.

वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून, प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार असून, याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत बैठक झाली आहे.  राज्य कृती दलाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार केला आहे, त्याचे पालन करण्याचे निर्देश प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिले.

Read in English

Web Title: If we leave home, we will be admitted to a private hospital, Health Minister Rajesh Tope warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.