हो य हो य वा र क री । पा हे पा हे रे पं ढ री ।।

By admin | Published: July 26, 2015 02:59 AM2015-07-26T02:59:53+5:302015-07-26T02:59:53+5:30

ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित

If yes, it is possible. Pa ha pa ha ray pu r .. | हो य हो य वा र क री । पा हे पा हे रे पं ढ री ।।

हो य हो य वा र क री । पा हे पा हे रे पं ढ री ।।

Next

- ह.भ.प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

ज्यापदार्थाची सत्ता कोणत्याही काळामध्ये बाधित होत नाही त्या सत्तेला पारमार्थिक सत्ता असे म्हणतात. असे पारमार्थिक सत्तावान जे ब्रह्मतत्त्व ते स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित असून सत्, चित्, आनंद, नित्य, पूर्ण असे आहे. हेच ब्रह्मतत्त्व संपूर्ण चराचरामध्ये भरलेले आहे. श्रुतीमाता आपणास स्पष्ट सांगते की, ‘सर्व खल्विदं ब्रह्म।’ असे हे व्यापक ब्रह्मतत्त्व तेच ‘मी’ आहे, असा अनुभव येणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त होणे होय. असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव अंतरी आला असता त्याची चिन्हे देहावर उमटतात.

तुकाराम महाराज सांगतात..
उमटती ठसे।
ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे।।
ब्रह्मप्राप्तीची ही चिन्हे (ठसे) पाच आहेत. अभिन्नता, अभयरूपता, आनंदरूपता, अनन्यता, अजन्मस्थिती ही पाच चिन्हे आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा सर्वसामान्यांप्रमाणे जरी दिसत असला तरी देहसंबंध पसाऱ्याचा व त्याचा काहीही संबंध उरलेला नसतो. काही कर्तव्य नाही, काही प्राप्तव्य नाही अशीच अवस्था झालेली असते. पंचदशीकार विद्यारण्यस्वामी सांगतात,
धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्य
मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं
सर्वमद्य संपन्नम्।।
पंचदशीकारांनी या अवस्थेलाच खऱ्या अर्थाची धन्यता सांगितलेली आहे. प्रापंचिक जीवनामध्ये सत्ता, संपत्ती, संतती प्राप्तीमध्ये धन्यता सांगितली जाते. परंतु पारमार्थिक जीवनामध्ये संतभेट व भगवद् प्राप्ती हीच खरी धन्यता आहे. या धन्यतेमध्ये काहीही प्रापंचिक कर्तव्य किंवा प्राप्तव्य राहिलेले नसते. ज्या ज्या इच्छा केल्या त्या त्या पूर्ण झालेल्या असतात. तुकाराम महाराज सांगतात,
कृतकृत्य झालो।
इच्छा केली ती पावलो।।
अशी ही परिपूर्णतेची अवस्था प्राप्त होणे व पुन्हा भगवंताच्या सगुण रूपांविषयी प्रेम निर्माण होऊन त्याच्या भजनात तल्लीन राहणे हे वारकरी संप्रदायाचे मूळ सूत्र आहे. याकरिता ‘ज्ञान गिळोनि गावा गोविंदु गा।’ हे वचन प्रसिद्ध आहे. याकरिता आवश्यकता आहे ती भक्तीची। ज्ञानीयांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात,
माझे मनीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुडी।।
याकरिता लागणारी जी भक्ती आहे ती कोणती? काय तिची व्याख्या? देवऋर्षी नारदमुनी भक्तिसूत्रात सांगतात,
।।सा त्वस्मिन्परमप्रेमरूपा।।
भगवंतावर परमप्रेम असणे
म्हणजेच भक्ती होय. प्रेमामध्ये वात्सल्यप्रेम, सख्य प्रेम, कामरूपी प्रेम आणि परमप्रेम असे प्रकार आहेत. यामध्ये परमप्रेम म्हणजे निष्काम प्रेम होय. या प्रेमालाच भक्ती म्हणतात.
वारकरी संप्रदायामध्ये याच तत्त्वज्ञानाचा सर्व साधू-संतांनी विचार सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराज सांगतात,
‘‘मी भक्त तू देव ऐसे करी।’’
या अवस्थेमध्ये भक्तीचा आनंद घेता येतो. घेतलेला आनंद इतरांना देता येतो. पंढरीच्या वारीमध्ये हेच चित्र आपणास सर्वत्र दिसून येते. इथे सर्व जण आपले मोठेपण विसरलेले असतात.

वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान व भक्ती या दोन तत्त्वांचा समन्वय पाहावयास मिळतो. शास्त्रीय दृष्टीने ‘ज्ञान’ हीच सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये या ज्ञान अवस्थेनंतरही भक्तीची अवस्था सांगितली आहे. यालाच वारकरी संप्रदायामध्ये ‘ज्ञानोत्तर भक्ती’ असे म्हणतात. हेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे. याच तत्त्वज्ञानात जगणारा हा पंढरीचा वारकरी आहे.

Web Title: If yes, it is possible. Pa ha pa ha ray pu r ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.