वेळ आल्यास खुर्चीही सोडेन!
By admin | Published: October 23, 2015 02:00 AM2015-10-23T02:00:03+5:302015-10-23T02:00:03+5:30
मी मंत्री व साखर कारखानदार असले, तरी ऊसतोडणी कामगार मला जास्त महत्त्वाचा आहे़ त्यामुळे या कामगारांना पगारवाढ मिळवून देणारच आहे़ वेळ पडल्यास त्यांच्यासाठी
पाथर्डी : ‘मी मंत्री व साखर कारखानदार असले, तरी ऊसतोडणी कामगार मला जास्त महत्त्वाचा आहे़ त्यामुळे या कामगारांना पगारवाढ मिळवून देणारच आहे़ वेळ पडल्यास त्यांच्यासाठी सत्तेला लाथाडून सरकार विरोधात रस्त्यावर उतरेन,’ अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
भगवानगड येथे गुरुवारी दसरा मेळावा झाला, या मेळाव्यात मुंडे बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री राम शिंदे, आ. महादेव जानकर, खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, खा. प्रीतम मुंडे, महंत डॉ. नामदेव शास्त्री व व अन्य मान्यवर उपस्थित होते. तोडणी कामगारांसाठी सुरू केलेल्या महामंडळातून मुलांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे़, असे त्या म्हणाल्या.
शेट्टी-जानकरांची विरोधकांवर टीका
ज्यांनी बँका खाल्ल्या, सिंचनाचे पैसे खाल्ले ते अजूनही मोकाट का ? यांना तुरूंगात टाकायला काय अडचण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव न घेता केली, तसेच सरकारने तोडणी कामगारांसाठी महामंडळाची घोषणा केली, आता महामंडळ चालू करा, अशी मागणी त्यांनी केली़ जानकर म्हणाले, ‘आमची नियत आणि नीती साफ आहे़ तुम्ही तुमची नीती व नियत साफ ठेवावी, तोडणी कामगारांच्या त्यागामुळे सरकार आले आहे, हे विसरू नका.’