आपण कुणाला नको असू तर बाजूला व्हावं - नानाचा गजेंद्र चौहानांना सल्ला
By admin | Published: July 11, 2015 07:00 PM2015-07-11T19:00:26+5:302015-07-11T19:46:53+5:30
आपण कुणाला नको असू तर आपण सरळ बाजूला व्हावं'असा सल्ला गजेंद्र चौहानांना देत अभिनेते नाना पाटेकर यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फिल्म अँड टेल्विहजन इन्स्टिट्युटमधील ( एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसचं 'आपण कुणाला नको असू तर आपण सरळ बाजूला व्हावं' असा सल्लाही त्यांनी एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना दिला आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ गेल्या महिन्याभरापासून एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनला अभिनेते अमोल पालेकर, अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूरसह अनेक दिग्गजांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आज नाना पाटेकर यांची भर पडली आहे.
यापूर्वी अमोल पालेकर यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत गजेंद्र चौहान यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला दिला होता. चौहान यांचं कर्तृत्व व त्यांची दृष्टी FTII च्या अध्यक्षपदासाठी पुरेशी नसल्याचं पालेकर यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारनेदेखील गजेंद्र चौहान यांची नियुक्ती हा ईगोचा मुद्दा करू नये आणि आपली चूक झाल्याचे स्वीकारून ती सुधारावी असे मत पालेकर यांनी व्यक्त केले.