दोषी आढळल्यास खुर्ची सोडेन - एकनाथ खडसे

By Admin | Published: May 16, 2016 07:48 PM2016-05-16T19:48:17+5:302016-05-16T19:48:17+5:30

जमिनीच्या संदर्भात एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसून यात दोषी आढळल्यास खुर्चीवर राहणार नाही राजीनामा देईल, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ​आज पत्रकार परिषदेत दिली

If you find guilty, leave the chair - Eknath Khadse | दोषी आढळल्यास खुर्ची सोडेन - एकनाथ खडसे

दोषी आढळल्यास खुर्ची सोडेन - एकनाथ खडसे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - ​जमिनीच्या संदर्भात एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसून यात दोषी आढळल्यास खुर्चीवर राहणार नाही राजीनामा देईल, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ​आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी तक्रार दाखल करणारे डॉ. रमेश जाधव यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असून याप्रकरणी सीबीआय चौकशीलाही आपली तयारी असल्याचे खडसे यांनी सांगितले. डॉ. रमेश जाधव ​यांनी खडसे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते गजानन पाटील यांनी ३० कोटी रुपये लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर लाच लुचपत विभागाने पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांना गेली अकरा वर्षे ओळखत असून ते माळकरी आहेत असेही त्यांनी सांगितले. 
 
दरम्यान, तक्रारदार डॉ. रमेश जाधव यांनी २००८-०९मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. दरम्यान त्यांनी आपल्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूलमंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायरानाची आहे. जमीन परिवहन खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने ही जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण २५ फेब्रुवारी रोजी दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला, असे खडसे म्हणाले. तक्रारदाराने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचेची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता ती व्यक्ती विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसे म्हणाले.
 

Web Title: If you find guilty, leave the chair - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.