कुंडली पाहण्याचा शौक असेल तर ज्योतिषशास्त्राचे दुकान टाका !

By admin | Published: June 20, 2017 02:29 PM2017-06-20T14:29:33+5:302017-06-20T14:29:33+5:30

कुंडल्या पाहण्याचा एवढाच शौक असेल तर राजीनामा देऊन खुशाल ज्योतिषशास्त्राचे दुकान टाकण्याची हिंमत दाखवावी असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

If you have a passion to watch the horoscope, then put in astrology shop! | कुंडली पाहण्याचा शौक असेल तर ज्योतिषशास्त्राचे दुकान टाका !

कुंडली पाहण्याचा शौक असेल तर ज्योतिषशास्त्राचे दुकान टाका !

Next

सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला : शेतीप्रश्नावर सरकार पुर्णपणे अपयशी
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतीच्या प्रश्नावर पुर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलने सुरू केली की, मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या कुंडल्या आमच्या जवळ असल्याचे सांगत फिरतात, कुंडल्यांवर आमचा विश्वास नाही परंतू मुख्यमंत्र्यांना कुंडल्या पाहण्याचा एवढाच शौक असेल तर राजीनामा देऊन खुशाल ज्योतिषशास्त्राचे दुकान टाकण्याची हिंमत दाखवावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
स्थानिक विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खा.सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासमवेत विदर्भ दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांचा आढावा तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांशी संवाद साधत आहेत. त्या पत्रकार परिषेदेत म्हणाल्या की, भाजपाचे सरकार हे शेतकी प्रश्नावर पुर्णपणे अपयशी ठरले, तूरीच्या भावाचा प्रश्न, हमी भाव देण्याचा प्रश्न असो की कर्ज माफीदेण्याचा प्रश्न असो या सरकाराला ठोस निर्णय घेता आले नाही. सरकसकट कर्ज माफीची मागणी असतानाही निकषांचा घोळ घालुन शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवले. सरकारचे हेच अपयश लपविण्यासाठी मुख्यमंत्री अनेक मुद्दे उकरून काढत जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: If you have a passion to watch the horoscope, then put in astrology shop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.