स्वाभिमान असेल तर बाहेर पडा
By admin | Published: July 11, 2015 01:57 AM2015-07-11T01:57:41+5:302015-07-11T14:24:05+5:30
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल,
मालवण (सिंधुदुर्ग) : बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचले.
महाराष्ट्रात भाजपाला एकहाती सत्ता मिळवता आली नाही, याची पक्षाध्यक्ष अमित शहा यांना खंत वाटत आहे. मात्र, एकहाती सत्तेचे वक्तव्य शिवसेनेला इशाराच आहे. भाजपाने शिवसेनेला सोबत घेतले असले तरी शिवसेनेचा खेळ केला जात आहे. शिवसेनेतील हरवलेला स्वाभिमान जागृत झाला, तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील, असे पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शुक्रवारी संवाद साधला.