मराठा मूक मोर्चा बोलू लागल्यास क्रांती - रावसाहेब कसबे
By admin | Published: October 10, 2016 09:22 PM2016-10-10T21:22:46+5:302016-10-10T21:22:46+5:30
मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही. परंतु, मराठा क्रांती मुक मोर्चा बोलेल त्या दिवशी क्रांती होईल,असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, कॅनडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन तसेच फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त ह्यबौध्द धम्म: 60 वर्षाचा प्रवास एक आकलन ह्णया विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रावसाहेब कसबे बोलत होते. कार्यक्रमास माजी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पंजाबराव वानखेडे, पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे, रोहिदास जाधव, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.
लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर अराजकता येईल,असे भाकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते,असे नमूद करून कसबे म्हणाले, समाजातील आर्थिक विषमतेमुळे राज्य भरात मराठा क्रांती मोर्चे काढले जात आहेत.परंतु, राज्याची सत्ता काही मोजक्या घराण्यांच्या हातात आहे. मराठा क्रांती मुक मोर्चाला बोलूता येत नाही. त्यामुळे मोर्चात सहभागी होणा-या तरुणांची फसवणूक होत आहे.मात्र,ज्या दिवशी मोर्चा बोलू लागेल त्या दिवशी क्रांती होईल.