वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:30 AM2017-04-06T00:30:44+5:302017-04-06T00:30:44+5:30

वाहनचालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार असून, ई-चलान यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

If you violate traffic rules, beware! | वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान!

वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान!

Next

पुणे : आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर सावधान! झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, विनाहेल्मेट, फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीची
करडी नजर राहणार असून, ई-चलान यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक
शाखेने बुधवारपासून आयटी सोल्यूशन्स कंपनीच्या सहकार्याने सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही सेवा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या वर्षभरात विविध अ‍ॅप, नवीन संकेतस्थळाद्वारे स्मार्ट होत असलेल्या पुणे पोलिसांची वाहतूक शाखाही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सज्ज झाली असून, दंडवसुलीसाठी, ‘ई-चलान’ या सेवेच्या कारवाईत्मक अस्त्राची निर्मिती केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील वेगवेगळ्या चौकांमध्ये एकूण १२३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, त्यामध्ये २१७ पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
चौकात वाहनचालकाच्या हालचालींवर वाहतूक कार्यालयातील सीसीटीव्ही युनिटमधून निगराणी ठेवली जाणार आहे. एखाद्या वाहनचालकाने नियमभंग
केल्यास त्याच्या छायाचित्रासह संपूर्ण माहिती संगणकीय सॉफ्टवेअरद्वारे संकलित होऊन वाहनचालकाला त्याबाबतचा एसएमएस पाठविला जात आहे.(प्रतिनिधी)
सध्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांकडून छायाचित्रासह माहिती पाठविली जात आहे. मात्र लवकरच नागरिकांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे आणि माहिती मागविली जाणार असून, अशा वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले.
या एसएमएसद्वारे दंडाची रक्कम भरण्याकरिता वाहनचालकाला लिंक पाठविली जात असून, त्या लिंकवर त्याला त्याच्या गाडीचा नंबर, चलन क्रमांक टाकल्यावर गुन्ह्याची माहिती मिळू शकणार आहे .वाहनचालक दंडाची रक्कम स्र४ल्ली३१ाां्रूङ्मस्र.ल्ली३ या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने, चौकातील ई-चलन मशिनवर कार्ड स्वाईप करून किंवा रोख रक्कम भरावयाची झाल्यास जवळच्या वाहतूक विभागात किंवा व्होडाफोन स्टोअरमध्ये जाऊन भरू शकतात, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त
डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौकामध्ये सर्वप्रकारच्या वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याकरिता एकूण २०० ई-चलन डिव्हाईसचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात या डिव्हाईसमध्ये दुपटीने वाढ केली जाणार आहे.
वाहनचालकाने यापूर्वी किती वेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला आहे, याची संपूर्ण माहिती जागीच डिव्हाईसमध्ये पाहाण्याची सोयही उपलब्ध आहे. वाहतूक शाखेकडे सात लाख वाहनचालकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत.
रक्कम भरली नाही
तर समन्स
वाहनचालकाने आॅनलाईन पद्धतीने दंडाची रक्कम भरल्यास एक दिवसाने वाहतूक शाखेला ती रक्कम प्राप्त होणार आहे. सात दिवसांत वाहनचालकाने रक्कम न भरल्यास त्याला कोर्टातून समन्स पाठविणे, आरटीओकडे त्याची संपूर्ण माहिती पाठविली जाणार आहे़ त्यामुळे गाडीचे कोणतेही व्यवहार करण्यास त्याला अडथळा आणला जाईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: If you violate traffic rules, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.