विद्युतविषयक समस्यांकडे दुर्लक्ष

By Admin | Published: June 9, 2016 02:20 AM2016-06-09T02:20:44+5:302016-06-09T02:20:44+5:30

जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत

Ignore electrical problems | विद्युतविषयक समस्यांकडे दुर्लक्ष

विद्युतविषयक समस्यांकडे दुर्लक्ष

googlenewsNext


करंजगाव : नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्यांवर विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात असून, महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रार नाणे मावळातील ग्रामस्थ करीत आहेत.
काही ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहेत. तसेच काही गावात डीपी उघड्या आहेत. काही डीपींचे दरवाजे खाली पडले आहेत. काहींमधील फ्यूज खराब झाले असल्याने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी थेट वायर जोडल्या आहेत. तेथे फ्यूज लावणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तेथील स्थिती खूप धोकादायक बनू शकते. पावसाळ्यात विद्युतप्रवाह कमी-जास्त होत असल्यामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होतात. अनेकदा दिवसातून दहा-दहा वेळा पुरवठा खंडित होतो. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे कर्मचारी चौकशीसुद्धा करीत नाहीत. कर्मचारी अरेरावीची उतरे देतात. सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी कामे करण्यास टाळाटाळ करतात. मीटर कनेक्शनसाठी विविध कारणे देत हेलपाटे मारायला लावतात. गावामध्ये आल्यावर गावात विद्युतविषयक समस्यांकडे ते लक्ष देत नाहीत.
अनेक डीपी बॉक्सला दरवाजे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत खांब, विद्युतवाहक तारा, डीपीचे फ्यूज व्यवस्थित करावेत. गावांमधील विद्युत समस्यांची पाहणी शाखा अभियंता व कर्मचारी यांनी करून ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
नवीन मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला आपली कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कागदपत्रे साहेबांच्या टेबलवर ठेवतात. गुरुवार भारनियमनाचा वार असल्याने आणि रविवारी असल्याने इतर दिवशी वीज मीटरच्या कोटेशनवर स्वाक्षरी केली जाते. स्वाक्षरी केल्यानंतर तेच कोटेशन बँकेत भरले जाते. कोटेशन भरल्यानंतर पुन्हा सहायक अभियंता यांच्याकडे दिले जाते. परंतु, मीटरसाठी महावितरण कार्यालयाकडे एक ते दोन महिने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारूनही कर्मचारी दाद देत नाहीत.

Web Title: Ignore electrical problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.