हत्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष

By admin | Published: May 16, 2016 01:58 AM2016-05-16T01:58:42+5:302016-05-16T01:58:42+5:30

दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाच्या भेकड राज्यकर्त्यांनी तपासाकडे दुर्लक्ष केले.

Ignore the investigation of the killings | हत्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष

हत्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष

Next

सांगली : समाजातील अनिष्ट आणि पिळवणूक करणाऱ्या प्रथा, परंपरांवर विवेकवादी दृष्टिकोनातून विरोध सुरू असताना, प्रतिगाम्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन मोहरे आपण गमावले. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाच्या भेकड राज्यकर्त्यांनी तपासाकडे
दुर्लक्ष केले.
सध्याच्या सरकारकडून मी आशावादी स्थिती नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रविवारी येथे केले.
दुसऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या समारोप डॉ. पाटील म्हणाले, जादूटोणाविरोधी कायदा करताना तत्कालीन शासनाने दिरंगाई केल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांत एक अस्वस्थपणा आहे. सध्याचे शासन परिवर्तनवादी विचार करणारे नसल्याने आजही समाजातील परिस्थिती आशादायक नाही.
ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणाले, आपल्या विवेकवादी विचाराने समाजात परिवर्तन घडवू पाहणाऱ्या तीन विवेकवादी विचारवंतांच्या हत्या झाल्या. तपास यंत्रणांना आरोपी माहीत असतानाही त्याचा अभ्यास राज्यकर्त्यांकडून होत नसल्याने एकप्रकारची अस्वस्थता समाजात असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील बाजारपेठेला अडचणी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, आजच्या नव्या पिढीला भारतीय समाज कसा असावा, याची स्वप्ने पडत असल्याचे या संमेलनातून दिसून आले. समाजव्यवस्थेतील टाकाऊ, भ्रामक, असत्य व गती मंद करणारे विचार नाकारण्याची इर्षा एक प्रेरणा देऊन जाणारी आहे.
सध्या विचारांवर बंदी आणण्याचे, त्यांना चाकोरीत बंदिस्त करण्याचे चालू असलेले प्रयत्न कृतीतून हाणून पाडण्याचे
आवाहनही त्यांनी केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Ignore the investigation of the killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.