आघाडी सरकारचे पाण्याकडे दुर्लक्ष
By admin | Published: October 15, 2016 03:50 AM2016-10-15T03:50:37+5:302016-10-15T03:50:37+5:30
पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे. जे काम हिवरेबाजारने केले त्याचे अनुकरण ‘आघाडी सरकार’ करू शकले नाही
अहमदनगर : पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे. जे काम हिवरेबाजारने केले त्याचे अनुकरण ‘आघाडी सरकार’ करू शकले नाही. आघाडी सरकारचे जलसंधारण आणि पाणी या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी हिवरेबाजारला भेट दिली. मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ५० सरपंच, ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि उपवनसरंक्षक ए. लक्ष्मी यांनी सर्वांचे स्वागत केले. मंत्री झाल्यावर गावकऱ्यांना कार्यक्रम घेण्यासाठी मंत्र्यांची तारीख घ्यावी लागते. मात्र, हिवरेबाजार गावाची तारीख घेण्याची वेळ आमच्यावर आली, असे राम शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)