अवैध ५४ बांधकामे भुईसपाट
By Admin | Published: March 7, 2017 02:55 AM2017-03-07T02:55:44+5:302017-03-07T02:55:44+5:30
५४ घरे, दुकाने आज पालघर तहसीलदार महेश सागर ह्यांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त करण्यात आली.
हितेन नाईक,
पालघर- जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला उभारण्यात आलेली ५४ घरे, दुकाने आज पालघर तहसीलदार महेश सागर ह्यांच्या देखरेखीखाली जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी अचानक कारवाईने आपली तुटणारे घरे पाहून सर्वत्र एकच आक्रोश सुरु होता. यावेळी कारवाईच्या आड येणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
नगर परिषद हद्दीतील व जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यालगत सर्व्हे न.४८/१/१/१ पैकी २३.०० क्षेत्रावर एका माजी नगरसेवकांने अतिक्रमण करून व त्या जागा गरीब, रोजंदारी कामगार यांची फसवणूक करून २० हजार ते दीड लाख रु पयांच्या मोबदल्यात विक्र ी केल्या होत्या.मागील २० ते २५ वर्षांपासून हे लोक त्या जागेवर रहात असून महावितरणने वीजपुरवठा केला होता. तर नगर परिषदेने घरपट्ट्ी लावून सार्वजनिक शौचालयेही बांधून दिली होती. निवडणुकीत येथील मतदारांची एक गठ्ठा मते नगरसेवकांना मिळत असल्याने त्यांनीही या अतिक्रमणाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ती बांडगुळा सारखी दिवसेंदिवस वाढत होती. शेजारी आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृह असून या झोपडीतील काही टवाळखोर तरु णांचा त्रास मुलींना होत असल्याच्या तक्र ारी होत्या.परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जात होते.
रस्त्या लगत असणारी ही अतिक्र मणे शासकीय जागेत आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडे जाणाऱ्या रस्त्याआड येत असल्याने तहसीलदारांनी विद्युत वितरण आणि मंडळ अधिकाऱ्या मार्फत काल (रविवारी)५४ अतिक्रमणधारकां विरोधात नोटीसी बजावल्या होत्या.आज सकाळी ९.३० वाजता तहसीलदार सागर, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, पोलीस निरीक्षक संजय हजारे, मंडळ अधिकारी राजेद्र पाटील, तलाठी विजू पाटील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी कारवाई दरम्यान उपस्थित होते.
जेसीबी पथकाने आपली घरे उद्धवस्थ करायला सुरुवात केल्यावर परिसरातील वातावरण भावूक बनले होते. काहींनी अयशस्वि विरोधही केला. एका नगर सेवकाकडून मी २० वर्षांपूर्वी हि जागा विकत घेतली होती. माझ्या मुलाचे नुकतेच १२ टाक्याचे आॅपरेशन झाले असून मी हृदयविकाराची रु ग्ण असल्याचे विश्वकर्मा ह्या महिलेने सांगितले. आमची घरे जर बेकायदेशीर होती तर आम्हाला पाणी, वीज, शौचालये इ. सोयीसुविधा का पुरविण्यात आल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आता ह्या तोडक कारवायाचे सत्र पुढेपुढे सरकणार असून पालघर, माहीम, बोईसर ई. भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्र मणावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
>तहसीलदार व पोलिसांशी हुज्जत
सकाळी अचानक कारवाईला सुरु वात झाल्यानंतर समोर जेसीबी आणि पोलीस बंदोबस्त पाहून आपल्या घरातील महत्वपूर्ण वस्तू वाचिवण्यासाठी एकाच धावपळ सुरू झाली. जेसीबीच्या पहिल्या फाटकाऱ्यानेच उध्वस्त होत असलेले आपले संसार वाचविण्यासाठी काही लोकांनी सरळ तहसीलदार, पोलिसांशी हुज्जती घालून स्वत:ला जेसीबी खाली झोकून देण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी वातावरण चांगलेच तापले होते.