बेकायदा दारूविक्री; ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 04:47 AM2017-02-16T04:47:31+5:302017-02-16T04:47:31+5:30
रायगड जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे.
Next
अलिबाग : रायगड जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री करणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ११ ठिकाणी झालेल्या या कारवाईत ८० हजार २६९ रुपये किमतीची गावठी दारू व दारू निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आहेत. निवडणूक काळात गावठी व बेकायदा दारू विक्री होऊ नये यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलिसांना धडक कारवाईचे आदेश् दिले आहेत.
त्यानुसार मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये गुन्हे दाखल करून पोलीस कारवाई करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)