आजार गंभीर असल्याने फाशीची शिक्षा रद्द
By admin | Published: May 9, 2014 01:44 AM2014-05-09T01:44:45+5:302014-05-09T01:44:45+5:30
फाशी देण्याआधी कैद्याची वैद्यकीय तपासणी केली जाते़ त्यात आरोपीचा आजार गंभीर असल्याचे आढळल्याने त्याला फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने हत्या करणारा आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करताना म्हटले आहे.
मुंबई : फाशी देण्याआधी कैद्याची वैद्यकीय तपासणी केली जाते़ त्यात आरोपीचा आजार गंभीर असल्याचे आढळल्याने त्याला फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने अल्पवयीन भाचीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करताना म्हटले आहे. सरकारी वकील श्रीमती मनकुंवर देशमुख यांनी आरोपीला जराही दया न दाखविता त्याची फाशी कायम करावी, असे आग्रही प्रतिपादन केले होते. आरोपीला एड्स झाला याचा अर्थ तो खूप कामातूर होता, असे दिसते. वासनेची ही वृित भूक भागविण्यासाठीच त्याने स्वत:च्या भाचीवर अत्याचार करून तिचा खून केला. यावर खल करून न्यायालयाने अभिप्राय नोंद केला. ही घटना सांगली जिल्ह्यातील असून सदाशिव कांबळे असे या आरोपीचे नाव आहे़ आपल्याला एड्स झाल्याचे या आरोपीने सांगली सत्र न्यायालयाला देखील सांगितले होते़ मात्र तेव्हा त्याचा कागदोपत्री पुरावा नव्हता़ त्यामुळे तेथील न्यायालयाने त्याला या क्रूर कृत्यासाठी फाशीची शिक्षा ठोठावली़ त्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले तर या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी सरकारनेही स्वतंत्र याचिका दाखल केली़ या संपुर्ण प्रक्रियेचा यात अभ्यास करण्यात आला. या दोन्ही याचिकांवर खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली़ त्यात अॅड़ अभयकुमार आपटे यांनी कांबळेच्या वतीने युक्तिवाद केला़ या सुनावणीत आरोपीने आपल्याला एड्स झाल्याचे न्यायालयाला सांगितले व शिक्षा कमी करण्याची मागणी केली़ त्यानुसार न्यायालयाने आरोपीच्या वैद्यकीय चाचणीची कागदपत्रे मागवली़ त्यात आरोपीला एड्स झाल्याचे स्पष्ट झाले़ (प्रतिनिधी)
च्सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे २७ फेब्रुवारी २०११ रोजी ही घटना घडली़ आरोपी मयत ंमुलीचा मामा होता. त्याने व्यवसाय करण्यासाठी पीडित मुलीच्या वडीलांकडे दोन हजार रूपये मागितले होते़ च्ते न दिल्याने याचा राग ठेवून आरोपी आठ वर्षांच्या भाचीला शाळेतून कपडे घेण्याचे अमिष दाखवून घेऊन गेला़ तेथून तो तिला शेतात घेऊन गेला व तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला़ त्यानंतर त्याने तिचा खून केला व तिचा मृतदेह तेथूच टाकून तो निघून गेला़ शाळेतून घरी न आल्याने मुलीचा शोध सुरू होता़
च्त्यावेळी ती मामासोबत गेली असल्याचे शाळेने पोलिसांना सांगितले़ त्यानुसार पोलिसांनी दुसर्याच दिवशी आरोपीला अटक केली़ त्यावेळी आरोपीने मुलीचा मृतदेह दाखवला़ त्यानंतर सदाशिववर आरोपपत्र दाखल झाले व सत्र न्यायालयात याचा खटला चालला़ यात १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली़ ती ग्राह्ण धरत सत्र न्यायालयाने सदाशिवला फाशीची शिक्षा ठोठावली़