दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 'आजी'ची सायकलने देशभ्रमंती

By admin | Published: July 24, 2016 08:40 PM2016-07-24T20:40:27+5:302016-07-24T20:40:50+5:30

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर येथील ६७ वर्षीय वृद्धेने २४ जुलैपासून सायकलद्वारे देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे.

The illusion of 'ill-grip' | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 'आजी'ची सायकलने देशभ्रमंती

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर 'आजी'ची सायकलने देशभ्रमंती

Next

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 24 - म्हातारवयात इतरांनी संगोपन करावे, अशी वेळ व अपेक्षा असताना सुद्धा दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर येथील ६७ वर्षीय वृद्धेने २४ जुलैपासून सायकलद्वारे देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे.
शहरातील नाथ प्लॉट परिसरात राहणाऱ्या रेखा देहभानकर या सन २००७मध्ये पंचायत समिती शेगाव येथून केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या. मात्र सेवानिवृत्तीनंतरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. समर्थ रामदास स्वामींच्या 'केल्याने देशाटन, येत असे चातुर्य' या उक्तीपासून बोध घेत त्यांनी सायकलने देशभ्रमंतीचा निर्णय घेतला. अशा वारीतूनच विविध मनोवृत्तींचा अभ्यास, निसर्गाची ओळख, विचारांची देवाण-घेवाण होते व समर्थ रामदासांच्या उक्तीचा परिचय होता. ज्ञान हे पुस्तकांपेक्षा अनुभवांचे मोठे असते, अशा विचारसरणीतून असे मत रेखा देवभानकर यांनी व्यक्त केले.

खामगाव ते शेगाव शेकडो पायीवारी त्यांनी केल्या आहेत. नोकरीत असताना १९९५ ते २००४ दरम्यान देऊळगाव राजा ते शेगाव अशी १४० किलोमीटरच्या सात पायी वारी पूर्ण केल्या. पायीवारीचा निश्चय पूर्ण केल्याच्या अनुभवातून त्यांनी शेगाव ते आळंदी सायकलवारीचा निश्चय केला व ही वारी पूर्णत्वास नेली. पंढरपूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र गोंदवले, शनिशिंगणापूर, अक्कलकोट, अंबेजोगाई, परळी या व इतर ठिकाणी त्यांनी सायकलवारीने भेट दिली. त्यानंतर सन २०१२ ते २०१४ अशी दोन वर्षे खडतर अशी सुमारे ४ हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर सन २०१५ मध्ये वैष्णोदेवी यात्रा सायकलने पूर्ण करण्याचा संकल्प करीत ही वारी सुध्दा पूर्ण केली. यातून मनोबल उंचावल्याने त्यांनी यावर्षीही पाच राज्यातून होत वैष्णोदेवीपर्यंतची यात्रा सायकलने सुरु केली आहे.

वैष्णोदेवी यात्रेनंतर कलने सुरु केली आहे. वैष्णोदेवी यात्रेनंतर दुसऱ्या टप्प्यात इतर राज्यातील यात्रा सुध्दा सायकलने पूर्ण करण्याचा संकल्प रेखाताई देहभानकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या यात्रा शुभारंभप्रसंगी परिसरातील नागरिकांनी त्यांचा पुष्पहाराने सत्कार केला.

Web Title: The illusion of 'ill-grip'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.