प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवणा-यांची कीव येते - उद्धव ठाकरे

By admin | Published: January 4, 2017 07:36 AM2017-01-04T07:36:23+5:302017-01-04T07:40:57+5:30

कबरीतल्या अफझालखानाचा बालही बाका करू न शकणारे लोक रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव येते

The image of the genius of the genius is ruined - Uddhav Thackeray | प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवणा-यांची कीव येते - उद्धव ठाकरे

प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवणा-यांची कीव येते - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोमकत
मुंबई, दि. 4 - राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणा-यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून सणसणीत टीका केली आहे. ज्या पापी औरंग्याने संभाजीराजांना हालहाल करून मारले त्या औरंग्याची कबर तीर्थस्थळ बनले आहे व तेथे सरकारी बंदोबस्त आहे. तो बंदोबस्त तोडून औरंग्याच्या कबरीवर हल्ला करण्याची हिंमत यांच्यात नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचा मारेकरी अफझलखान शांतपणे पहुडला आहे. त्या कबरीतल्या अफझालखानाचा बालही बाका करू न शकणारे लोक रात्रीच्या अंधारात महाराष्ट्राच्या प्रतिभासम्राटाचा पुतळा हटवतात तेव्हा त्यांची कीव येते. आधी गडकरींचा देह नष्ट झाला, आता त्यांचा पुतळा नष्ट केला गेला. मात्र तरीही गडकरी अजरामर राहतील अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पुतळा हटवणा-यांना धारेवर धरलं आहे. 
 
राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावर ज्यांनी रात्रीच्या अंधारात हल्ला केला ते मर्द महाराष्ट्राचे दुष्मन आहेत. अंधारात नेहमी पाप होते व पापाला शासन हे होतच असते. मराठी भाषा, साहित्य, नाट्य ज्यांनी अजरामर करून सोडले त्या प्रतिभासम्राट राम गणेश गडकरी अर्थात महाराष्ट्र कवी गोविंदाग्रजांचा पुतळा पुण्यातील संभाजी उद्यानातून काही भ्याड हल्लेखोरांनी हटवला आहे. गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील काही प्रसंगांमुळे छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी झाल्याचा ठपका ज्या मंडळींनी ठेवला आहे ते महाराष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक वैरी आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
राज्यात जातीपातीचे विषारी प्रवाह निर्माण करण्याचा हा प्रकार पुन्हा सुरू झाला असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका निवडणुकांची चिंता सोडावी व पुण्यातील संस्कृतीभंजकांना अद्दल घडवणारी कारवाई करण्याचे धाडस दाखवावे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 
 
गडकरी यांच्या पुतळ्यावरील हल्ला हा जातीय विद्वेषाचा फूत्कार आहे व यामागे सरळ पालिका निवडणुकांचे जातीय राजकारण दिसते. जातीय विद्वेषातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा ज्यांनी हटवला, जातीय त्वेषातून समर्थ रामदास स्वामींची बदनामी केली त्या लोकांनी राम गणेश गडकरींचा पुतळा काळोखात हलवून महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था ‘एकच प्याला’त गटांगळ्या खात असल्याचे सिद्ध केले आहे. ज्यांना शिवाजीराजांची सहिष्णुता कळली नाही व संभाजीराजांचा धर्माभिमान समजला नाही त्यांना प्रतिभासम्राट गडकरींची थोरवी काय कळणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
गडकर्‍यांची सुभाषिते, संवाद आणि काव्ये गेली ८५ वर्षे महाराष्ट्रात गाजत आहेत. ते कमालीचे महाराष्ट्रभक्त व टोकाचे शिवरायभक्त होते. ज्या ‘राजसंन्यास’वर काही दळभद्य्रांनी आक्षेप घेतला आहे त्या ‘राजसंन्यासा’तला हा महाराष्ट्र गौरव वाचा असंही उद्दव ठाकरे बोलले आहेत. राम गणेश गडकरी हे मराठी मनाचे मानबिंदूच राहिले. गडकरी हे पूर्णपणे बुद्धिजीवी होते. प्रतिभेच्या पंखावर बसून ते विचाराच्या आकाशात एकसारख्या भरार्‍या मारीत असत. साहित्य, काव्याला, नाट्याला त्यांनी आपले सर्वस्व वाहिले. म्हणूनच थोड्याशा आयुष्यात अत्यंत प्रभावी असे कर्तृत्व त्यांच्या हातून घडून आले. मराठी साहित्यात ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम यांच्यानंतर गडकरींएवढे सामर्थ्यवान साहित्य कोणत्याही लेखकाने निर्माण केलेले नाही असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 

Web Title: The image of the genius of the genius is ruined - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.