आयएमएचा आज राष्ट्रीय सहवेदना दिन
By admin | Published: January 17, 2017 03:02 PM2017-01-17T15:02:29+5:302017-01-17T15:02:29+5:30
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय सहवेदना दिन पाळण्यात आला. त्या निमीत्ताने हजारो डॉक्टरांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध
Next
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 17 - डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय सहवेदना दिन पाळण्यात आला. त्या निमीत्ताने देशभरासह राज्यातील हजारो डॉक्टरांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडे, डोंबिवलीहून संस्थेचे खजिनदार डॉ. मंगेश पाटे आणि महिला अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी सांगितले की, देशभर विविध ठिकाणी डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, ते योग्य नाही. आधी हल्ले होत होते आणि आता हत्या हॊत आहेत. ही चिंतेची बाब असून त्याचा आम्ही सर्व स्तरावर निषेध करतो.
केंद्र सरकारसह राज्य शासनाने याची नोंद घ्यावी हि आमची आताची भूमिका आहे, ती न घेतल्यास ठीकठिकाणी मोर्चे, घोषणाबाजी, भाषणे आदींसह डॉक्टर्स रस्त्यावर उतरतील.अलाहाबाद मध्ये डॉ.बन्सल यांच्यावर हल्ला झाला, त्यात त्यांची हय्या झाली. त्या आधी केरळ मध्ये तर नुकतेच पुण्यात तीन डॉक्टरांना विविध गुन्ह्यात गोवण्यात आले. याचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणून सहवेदना दिन म्हणून 17 जानेवारी रोजी सगळीकडे निषेध करण्यात येत आहे.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कडक कायदा व्हावा, राज्यात तो आहे पण त्याची अमलबजावणी होत नाही ही शोकांतिका असल्याचे डॉ.पाटे म्हणाले.