मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 03:16 PM2021-06-07T15:16:31+5:302021-06-07T15:17:08+5:30

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

imd issue heavy rainfall alert in mumbai with all districts of kokan maharashtra cm uddhav thackeray gave order to all agencies preparation for security measures | मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

googlenewsNext

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. 

धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे असेही आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. 

रुग्णसेवेत अडथळा नको
अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन  रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: imd issue heavy rainfall alert in mumbai with all districts of kokan maharashtra cm uddhav thackeray gave order to all agencies preparation for security measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.