विरारमध्ये नकली अंडी?
By admin | Published: April 11, 2017 10:32 PM2017-04-11T22:32:08+5:302017-04-11T22:32:08+5:30
विरारमध्ये एका दुकानातून आणलेली अंडी नकली असल्याचे उजेडात आले आहे. ही गावठी अंडी तळायला घेतल्यानंतर ती रबरासारखी कडक झाली होती
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 11 - विरारमध्ये एका दुकानातून आणलेली अंडी नकली असल्याचे उजेडात आले आहे. ही गावठी अंडी तळायला घेतल्यानंतर ती रबरासारखी कडक झाली होती. ही अंडी वाडा येथील एका पोल्ट्री फार्म मधून आणली गेली होती.
विरारमध्ये फिटनेस सेंटर चालवणारे मंदार मिंगले यांनी एका दुकानातून सहा गावठी अंडी घरी आणली होती. त्यांची पत्नी माया मिंगले यांनी अंडी तळायला घेतल्यानंतर वेगळाच वास आला. अंडे शिजत नव्हते. उलट ते रबरासारखे होऊन कडक झाले. कवचातुन रबरासारखा पदार्थ बाहेर आला. तसेच अंड्यात पिवळसर बलक अधिक प्रमाणात आढळून आले. त्यामुळे ही अंडी नकली असल्याचा आरोप मंदार आणि माया यांनी केला आहे.
दुकान मालक रफिक शेख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. अंडी असली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही अंडी वाडा येथील एका फोल्ट्री फार्म मधून आणल्याचे त्यांनी सांगितले.