दोषींना तत्काळ अटक करा

By admin | Published: August 25, 2016 03:03 AM2016-08-25T03:03:25+5:302016-08-25T03:03:25+5:30

महिला सरपंचाला ध्वजारोहणापासून वंचित ठेवण्यात आल्या प्रकरणी जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी नुकतीच वारळ गावात जिल्हा बैठक घेतली.

Immediately arrest the culprits immediately | दोषींना तत्काळ अटक करा

दोषींना तत्काळ अटक करा

Next


रोहा : म्हसळा तालुक्यातील वारळ येथील अनुसूचित जातीच्या महिला सरपंचाला ध्वजारोहणापासून वंचित ठेवण्यात आल्या प्रकरणी जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी नुकतीच वारळ गावात जिल्हा बैठक घेतली. या बैठकीनंतर म्हसळा पोलिसांची भेट घेऊन दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी रायगड जिल्हा चर्मकार संघटनेने केली.
जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधवांनी वारळ गावात एकत्र जमून समाजाची बैठक घेतली. यावेळी महिला सरपंच भारती चांदोरकर व गावातील समाजबांधवांशी झालेल्या प्रकाराबाबत जिल्हा संघटनेने चर्चा केली. १५ आॅगस्ट रोजी घडलेला सर्व प्रकाराची यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा संघटनेला माहिती दिली. रायगड जिल्हा चर्मकार संघटना या प्रकरणाचा सर्वोतोपरी पाठपुरावा करेल, तसेच वारळ ग्रामस्थांच्या पाठीशी जिल्हा कायम असेल याची ग्वाही जिल्हाध्यक्ष अरविंद सावळेकर यांनी बैठकीत दिली.
याबैठकीनंतर समाजबांधवांनी म्हसळा पोलीस ठाण्यात जाऊन सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांना जिल्हा संघटनेचे निवेदन देण्यात आले. यामध्ये भारती चांदोरकर यांनी म्हसळा पोलीस ठाणे येथे १६ आॅगस्ट २०१६ रोजी दिलेले तक्र ार अर्जानुसार सर्व आरोपींवर तातडीने कारवाई करून दोषींना अटक करावी व चांदोरकर यांना न्याय मिळावा अशी मागणी रायगड जिल्हा चर्मकार संघटनेतर्फेनिवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे अध्यक्ष अरविंद सावळेकर, उपाध्यक्ष दीपक अंबडकर यांच्यासह वारळ ग्रामस्थ उपस्थित होते.
>पोलिसांना दिले निवेदन
या बैठकीनंतर समाजबांधवांनी म्हसळा पोलीस ठाण्यात जाऊन सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांना जिल्हा संघटनेचे निवेदन देण्यात आले. यामध्ये भारती चांदोरकर यांनी म्हसळा पोलीस ठाणे येथे १६ आॅगस्ट २०१६ रोजी दिलेले तक्र ार अर्जानुसार सर्व आरोपींवर तातडीने कारवाई करून दोषींना अटक करावी व चांदोरकर यांना न्याय मिळावा. तरी जिल्हा पोलिसांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे व मागासवर्गीय चर्मकार समाजातील असंतोष दूर करावा, अशी मागणी रायगड जिल्हा चर्मकार संघटनेतर्फेनिवेदन देऊन करण्यात आली आहे.

Web Title: Immediately arrest the culprits immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.