मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी बांबुच्या सायकलने प्रवास
By Admin | Published: August 13, 2016 08:18 PM2016-08-13T20:18:17+5:302016-08-13T20:18:17+5:30
मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी पनवेलच्या प्रिसीलिया मदन व सुमित पारिंगेने कन्याकुमारी ते खारदूंग हा प्रवास चक्क बांबुच्या सायकलने सुरु केला आहे
>- ऑनलाइन लोकमत
कामरगाव (वाशिम), दि. 13 - मुलींच्या शिक्षणाची चळवळ व्यापक व्हावी यासाठी जनजागृतीचे अनेक उपक्रम राबविले जातात मात्र पनवेलच्या प्रिसीलिया मदन व सुमित पारिंगेने कन्याकुमारी ते खारदूंग हा प्रवास चक्क बांबुच्या सायकलने सुरु केला आहे. सद्या त्यांचा प्रवास वाशिम जिल्हयातून होत आहे.
११ जुलैला त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी हा प्रवास विमानाने केला त्यानंतर त्यांनी १४ जुलैला प्रत्यक्ष या सायकलप्रवासात सुरुवात केली. या प्रवासासाठी त्यांना एका कंपनीने प्रायोजकत्व दिले असून वजनाला हलक्या व चालवायला सोप्या अशा बांबु फ्रेमच्या सायकली उपलब्ध करुन दिल्या. सोबत आशिष तारु हे बांबुप्रेम टेक्नीशियन व मदतीकरिता सचिन जाधव या मोहीमेत सहभागी आहेत. सुमित पारींगे हे इंजिनिअर असून प्रिसीलिया ही ए.एस.सी कॉम्प्युटर झालेली आहे. या आधी प्रिसीलीयाने एकट्यानेच पनवेल ते कन्याकुमारी , पनवेल खारदुंग ,ओडीया, मनाली, खारदुंग हजारो कि.मी.चा प्रवास सायकलने केला आहे.
सुमित पारिंगे यांनी या आधी पनवेल ते सियाचीन ह्या खडतर प्रवासासह अनेक ठिकाणी हजारो कि़मी.प्रवास केला आहे. सध्या त्यांचा प्रवास वाशिम जिल्ह्यातून सुरु असून १८०० कि़मी.पल्ला त्यांनी गाठला आहे.या प्रवासादरम्यान त्यांनी ‘बेटी पढाओ मोहीमें’तर्गत ५० लाखांचा निधी गोळा करण्याचे त्यांचे लक्ष आहे. हा निधी फ्युएलड्रीम ही कंपनी आॅनलाईन गोळा करणार आहेत आणि हा निधी दिल्लीमधील शाळामध्ये शिकणाºया मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाºया इम्पॅक्ट या स्वयंसेवी संस्थेला तो दिला जाणार आहे हे विशेष. अवघ्या २२ वर्षीय तरुणाचे हे धाडस पाहून अनेकांना तीच कौतुक वाढते. सध्या गावकरी, प्रवासी व विद्यार्थ्यांना त्यांच्या बांबुच्या सायकली हा औत्सुकयाचा विषय ठरत आहे.