पोवाडा व लावणीच्या तालात सांगितले विज्ञानाचे महत्त्व
By Admin | Published: February 6, 2017 02:24 AM2017-02-06T02:24:52+5:302017-02-06T02:24:52+5:30
विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़
जळगाव : विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़ मराठी भाषेत कुसुमाग्रज, विं़दाक़रंदीकर, बा़सी़मर्ढेकर यांनी कवितांमधून विज्ञान तपासायला लावले़ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मानवी जीवनावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत यावर साहित्य निर्मिती झाली़ संत एकनाथ महाराज यांनीही भारूडांच्या सहाय्याने सोप्या भाषेत तत्वज्ञान मानवापर्यंत पोहचले़ अशा प्रकारे रविवारी मराठी विज्ञान साहित्य संमेलनात तिसऱ्या सत्रात कविता, कथांमधून वैज्ञानिक साहित्यांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला़
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई येथील प्रा़शिरीष गोपाळ देशपांडे होते़ अमरावतील येथील मोना चिमोटे, मुंबई येथील कॅप्टन सुनिल सुळे व औरंगाबाद येथील प्रा़यशवंत देशपांडे हे कविता चर्चासत्रात सहभागी झाले होते़ चौघा मान्यवरांनी कविता, कथांच्या माध्यमातून विज्ञान साहित्यांवर विचारमंथन केले़ प्रारंभी मोना चिमोटे यांनी सादरीकरण केले़ कुसुमाग्रज, बा़सी़मर्ढेकर, विं़दाक़रंदीकर यांनी कवितांमधून कशा प्रकारे वैज्ञानिक सकारात्मकता, व वैज्ञाानिक यांत्रिक प्रगती व्यक्त केली आहे, त्यावर चिमोटे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले़ बा़सी़मर्ढेकर यांच्या कवितांमधून विज्ञानाचा वापर तसेच त्याबद्दल माहिती मिळते़ तसेच त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन शब्दांमधून व्यक्त केले आहे़ वि़दाक़रंदीकर यांनीही विश्वरूप, मजूर या कवितांमधून विज्ञानाचा फायदा व तोटा शब्दबध्द करून मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले़