जळत्या अगरबत्तीभोवती घेतलेले फेरेही सप्तपदीच, उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:55 AM2018-05-01T06:55:55+5:302018-05-01T06:55:55+5:30

जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.

The important decision of the High Court, | जळत्या अगरबत्तीभोवती घेतलेले फेरेही सप्तपदीच, उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

जळत्या अगरबत्तीभोवती घेतलेले फेरेही सप्तपदीच, उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

मुंबई : जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.
मुंबईचे रहिवासी अमित अगरवाल (बदलेले नाव) यांनी त्यांची पत्नी कमला अगरवाल (बदलेले नाव) हिच्याशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचे कारण देत, वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, कुटुंब न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला अमित यांनी उच्च न्यायालयात अपील केले. यावरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सोमवारी होती.
अमित अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार, एका वर्तमानपत्रामध्ये आलेल्या जाहिरातीद्वारे त्यांना कमलाचा प्रस्ताव आला. १५ जानेवारी २००९ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर, लगेच १३ फेब्रुवारी २००९ रोजी विवाह ठरला. विवाहाच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने दोघांचा विवाह मोडला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी एका सामाजिक कार्यकर्तीचा फोन आला. तिने जवळच्या एका हनुमानाच्या मंदिरात बोलावले. मंदिरात न आल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविण्याची धमकी दिली. त्यामुळे तो मंदिरात गेला. तिथे त्याचे जबरदस्तीने कमलाशी लग्न लावून दिले. मीडिया व फोटोग्राफर्सना तिथे उपस्थित करण्यात आले आणि जबरदस्तीने कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या.
‘हिंदू विवाह कायद्यानुसार, हवनाभोवती सात फेरे घेणे बंधनकारक आहे, परंतु आमची सप्तपदी पवित्र अग्नीभोवती झाली नाही. हा विवाह हिंदू कायद्यानुसार झालेला नाही. त्यामुळे हा विवाह रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती अगरवाल यांनी न्यायालयाला केली.
त्यावर कमलाने आक्षेप घेतला. त्याचे आरोप फेटाळताना तिने न्यायालयाला सांगितले की, हनुमानाच्या मंदिरात अमितने बोलावले. त्याच्याबरोबर पाच-सहा नातेवाईक होते व त्याची आईही होती. पुजाºयाने मंत्र म्हणून आम्ही पेटलेल्या अगरबत्त्यांंभोवती सात फेरे घेतले आहे. १४ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यावर, अमितने कमलाला त्याच्या घरी नेले. २८ एप्रिल २००९ पर्यंत तो तिच्याशी नीट वागत होता. या कालावधीत
या दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. मात्र, अचानक २९ एप्रिल रोजी अमितने तिला घटस्फोटाची नोटीस बजावली. घटस्फोट मागण्याचे कारणही सांगितले नाही.

Web Title: The important decision of the High Court,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.