सराफा दुकानावर आयकर विभागाचा छापा

By Admin | Published: January 19, 2017 02:35 AM2017-01-19T02:35:31+5:302017-01-19T02:35:31+5:30

खामगाव शहरातील सराफा दुकानावर छापा; दिवसभर हिशेबाची पडताळणी.

Impression of Income Tax Department | सराफा दुकानावर आयकर विभागाचा छापा

सराफा दुकानावर आयकर विभागाचा छापा

googlenewsNext

खामगाव, दि. १८- येथील फरशी भागात असलेल्या एका ज्वेलर्सवर बुधवारी आयकर विभागाने छापा मारला. आयकर विभागाचे उपायुक्त अभय नन्नावरे यांच्या नेतृत्वातील पथकाने दुपारी येथील एका ज्वेलर्सवर धडक देऊन दिवसभर हिशेबाची पडताळणी केली.
नोटाबंदीनंतर बँकेत भरलेल्या मोठय़ा रकमेचा हिशेब न मिळाल्याने हा छापा मारण्यात आल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये होत आहे.
५00 व १ हजार रुपयांच्या नोटाबंदीनंतर शहरातील अनेक व्यापार्‍यांकडून नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात रकमा बँकेत भरण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून अशा व्यापार्‍यांकडील हिशेबाची पडताळणी सुरु झाल्याने बेहिशेबी मालमत्ता असणार्‍यांना धडकी भरली आहे.

Web Title: Impression of Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.