रात्री दहानंतर फटाके उडविल्यास कारावास
By admin | Published: October 30, 2016 12:54 AM2016-10-30T00:54:15+5:302016-10-30T00:54:15+5:30
शहरात दिवाळीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांवर मुंबई पोलिसांनी वेळेची मर्यादा घातली आहे. यात रात्री दहानंतर कोणी फटाके उडविल्यास त्याला कायदेशीर कारवाईला
मुंबई : शहरात दिवाळीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांवर मुंबई पोलिसांनी वेळेची मर्यादा घातली आहे. यात रात्री दहानंतर कोणी फटाके उडविल्यास त्याला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये पाच वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
त्यानुसार दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच फटाके उडविण्याच्या सुचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सरकारी नियमांनूसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी आहे. मात्र रात्री दहानंतर फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)