अमर महल उड्डाणपुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

By admin | Published: April 17, 2017 11:10 PM2017-04-17T23:10:43+5:302017-04-17T23:10:55+5:30

पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

The improper mattress of the Amar Mahal flyover will be changed | अमर महल उड्डाणपुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

अमर महल उड्डाणपुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत हा पुल वाहतुकीस पुर्ववत सुरु करण्यात येईल. तोपर्यंत होणाऱ्या गैरसोयीबद्दल जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाच्या दुरुस्तीबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव पी. एल. बोंगीरवार उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाणपुलाचे गर्डरचे सांधे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले होते. या पुलाचे बांधकाम 22 वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. या पुलाची लांबी 267 मीटर असून त्या पैकी 61 मीटरचा गाळा बाधित झाला आहे. तूर्त या पुलावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पुलाखालील वाहतूक अतिरिक्त गाळ्यातून सुरळीत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या पुलाच्या सुरक्षिततेसाठी व भविष्यातील हानी टाळण्याच्या दृष्टीने तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी आयआयटी, पवई येथील प्रा. डॉ. रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार या पुलाचे नादुरुस्त झालेले गर्डर नव्याने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन या पुलावरील वाहतूक पुर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

या पुलावरील अपेक्षित जड वाहतूकीपेक्षा सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाचा सांधा निखळण्याची शक्यता असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील इतर पुलांच्या सुरक्षिततेबाबत शासनाचे धोरण सर्व ब्रिटीशकालीन व धोकादायक वाटणाऱ्या पुलांच्या सर्वंकष तपासणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, मुंबईतील पुलांवरील वाढीव अवजड वाहतुकीचा विचार करता पुलांची सर्वंकष तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणावरील वाहतुकीत सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून जनतेने होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

निविदेप्रक्रियेसाठी नोंदणीकृत कंत्राटदार असण्याची अट रद्द
त्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी व जास्तीत जास्त स्पर्धात्मक देकार मिळावेत यासाठी निविदा सादर करणारे कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पंजीकृत असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांना पात्रता निकष पूर्ण करुन निविदेमध्ये सहभाग घेता येणार असल्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला असल्याची माहिती ही पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: The improper mattress of the Amar Mahal flyover will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.