दुधाचा सुधारित दर एक आॅगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:10 AM2018-07-26T02:10:33+5:302018-07-26T02:10:51+5:30

गायीच्या दुधाला मिळणार २५ रुपये; ग्राहकांना पूर्वीच्याच दराने मिळणार दूध

Improved rates of milk from August one | दुधाचा सुधारित दर एक आॅगस्टपासून

दुधाचा सुधारित दर एक आॅगस्टपासून

Next

पुणे : दूध उत्पादकांना येत्या १ आॅगस्टपासून २५ रुपये प्रतिलिटरप्रमाणे दर देण्याचा निर्णय दूध उत्पादकांच्या बैठकीत घेण्यात आला. नोंदी आणि हिशेब ठेवणे सोयीस्कर जावे यासाठी चालू महिन्यापासून सुधारित दराची अंमलबाजावणी करण्यात येणार आहे. दूध उत्पादकांना दर वाढवून देणार असले, तरी दुधाच्या भावात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.
राज्यातील गायीच्या दुधाचे दर १७ ते २० रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. ग्राहकाला मात्र ते ४० ते ४२ रुपये प्रतिलिटरनेच दूध मिळत होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलैपासून आंदोलन सुरु केले होते. अखेर १९ जुलैच्या रात्री दूधकोंडी फुटली. २१ जुलैपासून सुधारित दर देणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतरही दूध उत्पादकांना जुन्याच दराने पैसे देण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर दूधसंघाची मंगळवारी लोणावळा येथे बैठक झाली. त्यात पुढील महिन्यापासून सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक विष्णू हिंगे म्हणाले, पुढील महिन्यापासून दूध उत्पादकांना सुधारीत दराने भाव दिला जाईल. मंगळवारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ गायीच्या दूध दरातच बदल असून म्हशीच्या दुधासाठी पुर्वीप्रमाणेच ३६ रुपये प्रतिलिटर दर दिला जाईल.

> ...तर अनुदान नाही
दूध आंदोलनानंतर राज्य सरकारने दूध संघांना ५ रुपये प्रतिलिटरमागे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटरमागे ५ रुपये अधिक दर देण्यात येणार आहे. तसेच दूध भुकटीसाठी प्रतिकिलोमागे ५ रुपये आणि दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जाते. सरकारने घोषणा केल्यानुसार दूध संघांनी उत्पादकांना २५ रुपये प्रतिलिटरमागे भाव न दिल्यास त्यांना सरकारकडून दिल्या जाणाºया अनुदानास मुकावे लागेल.

Web Title: Improved rates of milk from August one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.