बीड जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: June 5, 2017 04:25 PM2017-06-05T16:25:56+5:302017-06-05T16:25:56+5:30
शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धारूर, तालखेडमध्ये आंदोलने करण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 5 - शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धारूर, तालखेडमध्ये आंदोलने करण्यात आली. सायंकाळपर्यंत हा बंद शांततेत पार पडला. जिल्ह्यातील माजलगावमध्ये सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर तालुक्यातील तालखेडमध्ये एसएफआय व शेतकºयांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीडसह अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, गेवराई, केज, वडवणी तालुक्यांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. धारूरमध्ये आठवडी बाजार बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. दुपारनंतर अनेक ठिकाणी दुकाने उघडल्याचे दिसून आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सरकारविरोधात घोषणाबाजी-
किसान क्रांती मोर्चा व विविध संघटनांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ठिकठिकाणी सरकारविरोधी घोषणाबाजी करीत आंदोलने करण्यात आली. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शेतक-यांनी टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. तर बीड शहरासह इतर ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून रस्त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.