कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 05:44 AM2017-06-06T05:44:18+5:302017-06-06T05:44:18+5:30

दूध आणि साखरेचे आगार असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Improved shutdown in Kolhapur, Sangli, Satara | कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उत्स्फूर्त बंद

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उत्स्फूर्त बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दूध आणि साखरेचे आगार असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चा, निदर्शने, सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत शेतकऱ्यांनी आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या.
कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळपर्यंत बंद होती. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी सुरू असलेली काही दुकाने बंद करणे भाग पाडले. रोज सकाळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शहरात येतो. अनेक शेतकरी, महिलाही महाव्दार रोडवर, शिंगोशी मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी येतात. मात्र, अनेकांनी कोल्हापुरात येणेच टाळल्याने सकाळी या परिसरात शांतता जाणवत होती.
‘गोकुळ’, ‘स्वाभिमानी’ ‘वारणा’ दूध संघाचे साडे बारा लाख लिटर दूध संकलन न झाल्याने सुमारे सहा कोटीचा थेट फटका बसला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शिल्लक माल विक्री करताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो रोखला.
सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चे, निदर्शने, पुतळा दहन तसेच दुधपुरवठा रोखण्याचे प्रकार संपाच्या पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. शहरात भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
साताऱ्यात जाळपोळ; रास्ता रोको
सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील व्यवहार शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केले असले तरी बाजारपेठा थोड्या-फार प्रमाणात सुरू होत्या. साताऱ्यात कार्यकर्त्यांनी दुकाने सुरु केलेल्या व्यापाऱ्यांना दूध दिले तर दहिवडीत शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतले.

Web Title: Improved shutdown in Kolhapur, Sangli, Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.