छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा

By admin | Published: September 20, 2016 04:54 AM2016-09-20T04:54:29+5:302016-09-20T04:54:29+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली

Improvement of Chagan Bhujbal's health | छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा

छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा

Next


मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. भुजबळ यांचा ताप कमी झाला असून त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
भुजबळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आर्थर रोड कारागृहातून शनिवारी सायंकाळी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी पडत असून सांध्यांना सूज आली आहे. विविध चाचण्या केल्यावर त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान झाले. मात्र, त्यांची डेंग्यूची तपासणी निगेटिव्ह आली. त्यांना व्हायरल फिवर आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
भुजबळ यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Improvement of Chagan Bhujbal's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.