अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन तूर्तास थांबले

By admin | Published: August 13, 2015 02:02 AM2015-08-13T02:02:45+5:302015-08-13T02:02:45+5:30

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करणे योग्य नाही, अशी ताठर भूमिका प्राध्यापकांनीच घेतल्यामुळे

Improvised projects have stopped immediately | अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन तूर्तास थांबले

अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन तूर्तास थांबले

Next

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करणे योग्य नाही, अशी ताठर भूमिका प्राध्यापकांनीच घेतल्यामुळे ही प्रक्रिया तूर्तास थांबली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय संस्थेच्या शिक्षणप्रक्रियेत अशाप्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी २००८ च्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण चित्रपट प्रकल्पाचे मूल्यमापन करण्याचे आदेश दिले होते.
मात्र ही एक राजकीय खेळी असून, ६२ दिवस चाललेले आंदोलन दडपून टाकण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी याविरूद्ध आवाज उठविला. त्यामुळे विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पाचे मूल्यमापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Improvised projects have stopped immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.