साखरपुडा आटोपला अन् काही दिवसांतच भावी जावई मुलीला घेऊन फुर्रर
By नितिन गव्हाळे | Published: April 5, 2023 06:07 PM2023-04-05T18:07:07+5:302023-04-05T18:07:57+5:30
अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला.
अकोला - जानेवारी महिन्यात मुलीचा साखरपुडा आटोपला. परंतु मुलीचे वय १७ वर्ष ६ महिने असल्याने, कुटूंबियांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा विवाह निश्चित केला. परंतु भावी जावयाने त्यापूर्वीच मुलीला काही कारणास्तव फूस लावून पळवून नेले. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला. परंतु मुलीचे वय कमी असल्याने, त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न ठरविले. मुलीसोबत भावी जावयाचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे. दरम्यान मुलीला बरे वाटत नसल्याने, अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी घरी आला. जावई म्हणून सासुनेही आदरातिथ्य केले. सासुला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघुन गेले. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही. दोघेही बाहेर गेले असतील. असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नाही.
मुलीचा साखरपुडा झालेला असल्यामुळे या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही. परंतु मुलगी व भावी जावई न परतल्याने, महिलेने अमरावती येथील त्यांच्या घरीसुद्धा चौकशी केली. याठिकाणीही दोघे आढळून आले नाही. अखेर महिलेने अकोट फैल पोलिस ठाण्यात भावी जावायाविरूद्ध तक्रार दाखल केला.