"...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही", अमित शाह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 08:52 PM2024-04-14T20:52:43+5:302024-04-14T20:53:20+5:30

"राहुल बाबा आमच्याकडे दोन टर्मपासून पूर्ण बहुमत आहे. या उलट आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल संपवण्यासाठी केला."

In BJP politics reservation will not be removed and no one will be allowed to be removed Amit Shah's big statement | "...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही", अमित शाह यांचं मोठं विधान

"...तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवूही देणार नाही", अमित शाह यांचं मोठं विधान

काँग्रेस खोटं बोलत आहे की, भाजपला 400 जागा मिळाल्या, तर ते आरक्षण संपवून टाकतील. राहुल बाबा आमच्याकडे दोन टर्मपासून पूर्ण बहुमत आहे. या उलट आम्ही आमच्या बहुमताचा वापर कलम 370 हटवण्यासाठी केला. आम्ही आमच्या बहुमताचा वापर ट्रिपल संपवण्यासाठी केला. एवढेच नाही, तर "आज मी -भंडारा-गोंदियातील जनतेला सांगून जात आहे की, जोवर भाजप राजकारणामध्ये आहे. तोवर आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला  हटवूही देणार नाही, ही भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे," अशा शब्दात आज भाजप नेते अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला. ते भंडारा येथे एका जाहीर सभेत बोलत होते.

शाह म्हणाले, काँग्रेस आज बाबासाहेबांचे नाव घेऊन मतं मागण्यासाठी घरो घरी फिरत आहे. 1954 च्या पोट निवडणुकीत याच काँग्रेसने बाबा साहेबांच्या विरोधात मोर्चेबांधनी करण्याचे काम केले होते. हाच काँग्रेस पक्ष होता, ज्याने 5 दशकांपर्यंत सत्तेत राहूनही बाबा साहेबांना भारत रत्न दिले नव्हते. भाजपने बाबा साहेबांशी संबंधित पाचही तिर्थ स्थानांना विकसित करून, बाबा साहेबांना अमर करण्याचे काम केले आहे," असेही शाह म्हणाले.

मोदींनी पाच वर्षातच न्यायालयातून निर्णयही आणला, आणि प्राणप्रतिष्ठाही केली -
काँग्रेसने अनेक वर्ष राम मंदिराचा मुद्दा अडकवत ठेवला, लटकवत ठेवला भटकवला, बनू दिले नाही. मात्र, मोदींनी पाच वर्षातच न्यायालयातून निर्णयही आणला, भूमिपूजनही केले आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठाही केली. आणि आता या 17 तारखेला श्रीराम 500 वर्षानंतर आपला जन्मदिवस भव्य मंदिरात साजरा करणार आहेत. असेही शाह म्हणाले.


 

Web Title: In BJP politics reservation will not be removed and no one will be allowed to be removed Amit Shah's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.