धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

By श्रीनिवास भोसले | Published: September 18, 2023 06:47 AM2023-09-18T06:47:26+5:302023-09-18T06:47:53+5:30

महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते

In Nanded, The youth Committed Suicide for the Maratha reservation | धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

googlenewsNext

नांदेड : शासनाच्या नाकर्तेणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका युवकाने गळफास लावून स्वतःचे जीवन संपविले. ही घटना हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात आरक्षण प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते. सरकारच्या मन धरनी नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी आपल आमरण उपोषण सोडले असले तरीही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आमरण उपोषण चालू होते .
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कामारी तालुका हिमायतनगर येथे काही मराठा बांधव मागच्या दोन दिवसापासून उपोषणास बसले होते.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षण मिळत नसल्याची भावना कामारी येथील युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारीकर यांची निर्माण झाली. शासनाच्या या राजकीय डावपेचाला कंटाळून त्यांनी अखेर रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास फाशी घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे .पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांना या ठिकाणी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी "मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे" असे स्पष्टपणे लिहिलेलं आढळून आले आहे. 

पालकमंत्र्यांनी भेट दिल्यावरच मृतदेह घेणार ताब्यात
मयताचे प्रेत हे हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात असून कामारी व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी व सकल मराठा समाजाने मृतदेह पालकमंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्यक्ष येऊन भेट दिल्याशिवाय ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Web Title: In Nanded, The youth Committed Suicide for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.