भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेगावात गर्दी, राहूल गांधी वरखेड फाट्यावर दाखल
By निलेश जोशी | Published: November 18, 2022 11:41 AM2022-11-18T11:41:06+5:302022-11-18T11:41:31+5:30
खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील १२ व्या दिवशी सकाळी १०:३२ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर पोहोचली आहे.
शेगाव:
खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील १२ व्या दिवशी सकाळी १०:३२ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर पोहोचली आहे. दरम्यान भारत जोडो यात्रा आणि शेगावमधील राहूल गांधी यांची दुपारची जाहीर सभा पहाता महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक शेगावमध्ये दाखल झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी राहूल गांधी यांचे बाळापूर टिपॉईंटवर स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत शेगाव पासून १५ किमी अंतरावर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. सकाळी साडेआठ वाजता राहूल गांधीची ही पदयात्रा मातृतिर्थ जिल्ह्यात प्रवेस करती झाली.
दुसरीकडे बाळापूर-शेगाव मार्गावर पदयात्रेच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमा झाला आहे. सोबतच जवळपा बुद्रूक येथील रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गच्चीवर जाऊन राहूल गांधी यांच्या यात्रेचा नजारा पहाण्यात उत्सूकता दाखवली. तुर्तास राहूल गांधी यांची यात्रा वरखेड फाट्याजवळ पोहोचली असून येथे ११ वाजता २१ फुटी विठ्ठल मुर्तीच्या समोर वारकरी पोखात ते पावली खेळणार आहे. सोबतच सामाजिक चळवळीतील काही कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.
जवळ बुद्रूक येथे वारकाऱ्यांच्या पोखात काही काँग्रसे कार्यकर्त्यांनी राहूल गांधी यांचे स्वागत केले. गायत्री सेवा कुंज नजीक हे स्वागत झाले.
दरम्यान शेगावमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अमरावती, नागपूरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात काँग्रेसचे पदाधिकारी दाखल झाले आहेत.
श्रींचे घेणार दर्शन
खा. राहूल गांधी हे वरखेड फाट्यावरील पावलीच्या कार्यक्रमानंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर संत श्री गजानन महाराजंच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १:४५ ते ४:१५ अर्थात जवळपास अडीच तास खा. राहूल गांधी हे शेगाव संस्थांमध्ये थांबून संस्थांच्या कार्याची सविस्तर माहितीही ते घेणार आहेत.