स्वच्छ सर्वेक्षणात शेगाव पालिकेचा जिल्ह्यात डंका!, खामगाव नगर पालिका दुसऱ्या स्थानी
By अनिल गवई | Published: October 18, 2022 10:05 PM2022-10-18T22:05:32+5:302022-10-18T22:06:05+5:30
केंद्र शासनाच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ अंतर्गत देशातील कचरा मुक्त शहराची रेटींग जाहीर केली आहे.
खामगाव:
केंद्र शासनाच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ अंतर्गत देशातील कचरा मुक्त शहराची रेटींग जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती विभागात शेगाव नगर पालिकेने तिसरे स्थान पटकाविले आहे. त्याचवेळी खामगाव पालिका सातव्यास्थानी आहे. मात्र, गतवेळीच्या तुलनेत यंदा खामगाव पालिकेची रेटींगमध्ये पिछेहाट झाली असून जिल्ह्यातील उर्वरित ०९ पालिकाही माघारल्या आहेत.
केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडुन कचरा मुक्त शहराचे तारांकीत रेटींग नुकतेच जाहीर केले आहे. केंद्र शासनाच्याकडुन दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणातंर्गत २०२२ च्या सर्व्हेक्षण नुकतेच पुर्ण झाले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये शेगाव पालिकेने बुलडाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचवेळी खामगाव पालीका अमरावती विभागात सात स्टार घेऊन दुसºया स्थानी आहे.
सहा हजार मुद्यांची तपासणी!
स्वच्छ भारत मिशनतंर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये वर्षभरात देशातल्या सर्वच शहरांमध्ये स्वच्छता विषयक विविध बाबींचा कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येतो. स्वच्छता विषयक पायाभूत सुविधांची उभारणी, कचरा संकलन वाहतूक व प्रक्रीया, नागरिकांचा सहभाग, जनजागृती त्याचबरोबर नागरिकांचा प्रतिसाद आदी पाच ते सहा मुद्यांची सुक्ष्म व बारकाईने निरिक्षण केले जाते. केंद्र शासनातंर्गत क्लॉलीटी कॉन्सील आॅफ इंडिया या सर्वोच्च त्रयस्त तपासणी संस्थेतर्फे गुप्त पध्दतीने तपासणी केली जाते. हे विशेष.
अवघ्या चार पालिकांनी मिळविले स्टार!
- अमरावती विभागातील ५७ नगर पालिकांपैकी केवळ चार पालिका कचरामुक्त शहराच्या रेटींगमध्ये यशस्वी ठरल्या. यामध्ये सेंदुरर्जना घाट नगर पालिकेला-तीन तर खामगाव, शेगाव आणि तिवसा नगर पालिकांना अनुक्रमे एक स्टार मिळाला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात बुलडाणा जिल्ह्यात शेगाव नगर पालिकेची कामगिरी समाधानकारक आहे. विभागात तृतीय तर जिल्ह्यात नगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
-डॉ. जयश्री काटकर-बोराडे मुख्याधिकारी, शेगाव.