सध्याच्या वातावरणात शरद पवारांकडे संभ्रम निर्माण करण्याएवढाच वेळ; मुनगंटीवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:50 PM2023-08-26T12:50:20+5:302023-08-26T12:56:03+5:30
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवारांवर टीका केली. याचबरोबर पवारांनाही टोला लगावला.
विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपमध्ये येणार नाहीत, एवढं जरी जाहीर केले तरी बास आहे. ही त्यांची काँग्रेसमधील शेवटची निवडणूक असू शकते, असे वातावरण आहे. त्यामुळे हास्यस्पद विधान करण्यात काही अर्थ नाही. असे विधाने करून ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवारांवर केली. याचबरोबर पवारांनाही टोला लगावला.
सध्याच्या राजकीय वातावरणात शरद पवार संभ्रम निर्माण करण्याएवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.
इतिहासामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य नंतरचा कालखंड शिकवतो. त्यामुळे पंडित नेहरूही शिकवले जातील आणि नरेंद्र मोदी ही शिकवले जातील. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस समाजवादी आणि भाजप सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल, असे ते म्हणाले.
विरोधी पक्ष नेत्यांच्या जुन्या भाषणांची क्लिप काढून ऐकवली आणि त्यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातले जुने मत काय? हे सांगितले तर बरं होईल. ते नेहमी भूमिका बदलतात, त्यामुळे भूमिका बदलून ते लोकांना आपल्या बाजूने करू शकत नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले.