कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:15 PM2022-10-07T22:15:49+5:302022-10-07T22:16:40+5:30

मुंबई: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत  वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ...

In the wake of covid, artists will be given financial support till March 31, 2023- Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar | कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next

मुंबई: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत  वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.याशिवाय समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. 

 

Web Title: In the wake of covid, artists will be given financial support till March 31, 2023- Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.