उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली
By सदानंद नाईक | Published: October 2, 2022 06:36 PM2022-10-02T18:36:53+5:302022-10-02T18:36:53+5:30
कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली.
कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली. शहरात इमारतीचे प्लास्टर व स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत लवकर परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणीही होत आहे.
उल्हासनगरात गेल्या महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. सुरक्षितेचा उपाय म्हणून धोकादायक व १० वर्ष जुन्या इमारतीला महापालिकेने नोटिसा देऊन इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती करण्यास सांगण्यात येत आहे. कॅम्प नं-५ येथील बहुमजली महाशिव इमारतीला यापूर्वीचे महापालिकेने नोटीस देऊन स्ट्रक्चर ऑडिट करण्यास सांगितले होते. स्ट्रक्चर ऑडिट मध्ये इमारत त्वरित दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. मात्र प्लॉटधारकांनी इमारतीची दुरुस्ती न करता, इमारत सोडून जाण्यास सुरवात केली. सद्यस्थितीत इमारतीत मध्ये ५ कुटुंब राहत असून तळमळल्यावर दुकाने आहेत. रविवारी एक दुकानदार दुकान उघडण्यास आला असता, दुकानात प्लास्टर पडलेले दिसले. याप्रकारने दुकानदारात भीती निर्माण होऊन त्याने याबाबतची महापालिका सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना माहिती दिली.
सहायक आयुक्त शिंपी यांनी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांना इमारतीचे प्लास्टर पडल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या सूचनेनुसार इमारत खाली करण्यात आली. अशी माहिती शिंपी यांनी दिली. शहरात इमारतीचे स्लॅब व प्लास्टर पडण्याचे सत्र सुरू असून जुन्या व धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. राज्य शासनाने धोकादायक इमारती बाबत लवकर निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा. अश्या मागणीने जोर पकडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात तशी घोषणा केली होती. त्याचा (जीआर) परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी होत