विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:05 AM2024-10-02T06:05:18+5:302024-10-02T06:05:28+5:30

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप लढणार असलेल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना आमदारकीसाठी कोण उमेदवार हवा आहे याचे तीन पसंतीक्रम घेण्यात आले.

In Vidarbha, Marathwada, North Maharashtra, the options of many BJP candidates are closed | विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीतील तीन पक्षांचा विधानसभा निवडणूक जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याआधीच राज्याच्या तीन भागांमध्ये मतदारसंघ निश्चित करून भाजपने मंगळवारी प्रत्येक मतदार संघासाठी तीन उमेदवारांचा पसंतीक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतला. उर्वरित मतदारसंघात ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजप लढणार असलेल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना आमदारकीसाठी कोण उमेदवार हवा आहे याचे तीन पसंतीक्रम घेण्यात आले. एका कागदावर हे पसंतीक्रम घेऊन नंतर ते लिफाफा बंद करण्यात आले. यापैकी काही मतदारसंघांवर शिंदे सेना आणि अजित पवार गटानेही दावा सांगितलेला असताना आपली उमेदवार शोध मोहीम गतिमान केली आहे. मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी असे पसंतीक्रम घेण्यात येणार आहेत.

गोवा आणि बिहारचा लिफाफा पॅटर्न 
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप संघटनेत वेगवेगळे प्रयोग करीत आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेशच्या टीमकडून प्रचार यंत्रणा राबविणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बौद्धिक वर्ग झाल्यानंतर आता गोवा आणि बिहार विधानसभा निवडणुकीत राबविलेला लिफाफा पॅटर्न राज्यात आणला.

नगरमध्ये गोंधळ : मुंढे समर्थक घुसविण्याचा प्रयत्न
अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्यावेळी प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे समर्थकांनी मतदानाचा आग्रह धरत गोंधळ घातला. त्यांना पक्ष निरीक्षकांनी मतदान करू दिले. मात्र, ज्यांची नावे यादीत नसतील त्यांची मते ग्राह्य धरणार नाही, असे पक्षनिरीक्षकांनी स्पष्ट केले.

कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघांत झाले भाजपचे मतदान
मराठवाडा :  छत्रपती संभाजीनगर :  औरंगाबाद पूर्व, फुलंब्री, गंगापूर | जालना : भोकरदन, परतूर |  लातूर : लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, उदगीर, निलंगा | नांदेड : नायगाव, भोकर, मुखेड, देगलूर, किनवट | परभणी : जिंतूर, गंगाखेड 
विदर्भ : अमरावती : तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट | अकोला : अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, अकोट | बुलढाणा : चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर | यवतमाळ : यवतमाळ, वणी, राळेगाव, उमरखेड, आर्णी | वाशिम : वाशिम, कारंजा, रिसोड | नागपूर : कामठी, उमरेड, सावनेर, काटोल, हिंगणा, नागपूर पूर्व | गोंदिया : गोंदिया, तिरोडा, देवरी | गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी | भंडारा : साकोली | वर्धा : वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट 
उत्तर महाराष्ट्र : अहमदनगर : अहमदनगर शहर, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, कर्जत जामखेड, श्रीगोंदा, संगमनेर  | जळगाव : भुसावळ, जामनेर, जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर

Web Title: In Vidarbha, Marathwada, North Maharashtra, the options of many BJP candidates are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा