Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 06:29 AM2018-08-10T06:29:13+5:302018-08-10T06:29:34+5:30

Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Inappropriate turn of 'Maharashtra Bandh', the protesters in Pune, Aurangabad, were injured, the police were injured | Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

googlenewsNext

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रत दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने अफवांना आळा बसला. मात्र उर्वरित ठिकाणी झालेल्या हिंसक घटना, सरकारी कार्यालयांची तोडफोड आणि पोलिसांवरील दगडफेकीमुळे या आंदोलनाला गालबोटही लागले.
आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. मुंबई, ठाणे आणि कोकण वगळता इतरत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि बंद यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही दिवसांत आंदोलकांनी एस.टी. बसला टार्गेट केल्यामुळे परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर उतरवली नाही. त्यामुळे आंदोलकांच्या तडाख्यातून एसटी वाचली. पश्चिम महाराष्टÑात बंद शांततेत पार पडला. सर्वपक्षीयांनी बंदचे आवाहन केल्याने अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखी परिस्थिती होती.
अहिंसक मार्गाने बंद पाळण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले होते. तशी आचारसंहिताही लागू केली होती. मात्र तरीही बंददरम्यान पुणे, औरंगाबाद येथे हिंसक पडसाद उमटले.
>मुंबईतील बाजारपेठा ठप्प : मुंबईतील वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणत्याही हिंसक घटनेविना बहुतेक बाजारपेठा, शाळा व दुकाने बंद असल्याने मुंबई स्तब्ध झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
>विदर्भात उत्स्फूर्त बंद : बंदला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणतीही अनुचित घटना न घडता बंद शांततेत पार पडला. नागपूरसह अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठ बंद होती. शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. बुलडाण्यात आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी मुंडन केल. तर नागपुरात रेल्वेरुळावर बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी वेळीच बाजूला केल्याने दुर्घटना टळली.
>दोघांची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी घडल्या.
>जिल्हाधिकारी कार्यालयात राडा
पुण्यात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. चांदणी चौकातही आंदोलकांनी राडा केला.
या वेळी झालेल्या
दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले.
>औरंगाबादनजीक वाळूज
येथे आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली.

Web Title: Inappropriate turn of 'Maharashtra Bandh', the protesters in Pune, Aurangabad, were injured, the police were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.